महाराष्ट्र

18 ते 45 वयोगटातील व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

करोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. येत्या एक मे पासून १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींनाही लस दिली जाणार आहे. मात्र, कोरोना लस घेण्यासाठी या वयोगटातील व्यक्तींनी कोविन वेब पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. ४५ वर्षांपुढील व्यक्ती मात्र लसीकरणाच्या ठिकाणी थेट जाऊन लस घेऊ शकतील.

लसीकरण सर्वांसाठी खुले झाल्यानंतर लशीच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना कोविन पोर्टलवर नोंदणी करून अपाँईंटमेंट घ्यावी लागेल. गोंधळ न उडण्यासाठी सुरुवातीला या व्यक्तींना कोविनवर नोंदणी न करता थेट लसीकरणाच्या ठिकाणी जावून लस घेता येणार नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

येत्या २८ तारखेपासून १८ वर्षांवरील सर्वांना ‘कोविन’ किंवा ‘आरोग्यसेतू’ ॲपवर नोंदणी करता येईल. लस घेण्याची प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या पूर्ततेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.सध्या खासगी लसीकरण केंद्रे सरकारकडून लस घेऊन प्रत्येक व्यक्तीला प्रतिडोस २५० रुपये घेऊन ती देतात. येत्या एक मे पासून त्यांना सरकारऐवजी थेट उत्पादकांकडून लस घेता येईल. सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांपुढील व्यक्ती व फ्रंटलाईन वर्करचे विनामूल्स लसीकरण सुरूच राहील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे