आपल खान्देश

खासदार सुभाष भामरेंच्या भावाचा माजी आमदारांकडून पराभव


धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

धुळे: धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या तीनही माजी आमदारांनी आपला गड राखत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी त्याचबरोबर धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे या तीनही माजी आमदारांनी विजय मिळवला आहे. धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सुभाष भामरे यांच्या भावाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

सुभाष भामरेंच्या भावाचा माजी आमदारांकडून पराभव

धुळे जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी मतदान झालं होतं. भाजप नेते माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश रामराव पाटील यांचा पराभव झाला आहे. सुभाष भामरे यांना चांगलाच धक्का मानला जातो आहे. माजी आमदार शरद पाटील यांनी सुभाष भामरे यांच्या भावाचा पराभव केला आहे

निवडणुकीदरम्यान भाजप,काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे बघायला मिळाले. तर. शिवसेनेने मात्र वेगळी चूल मांडल्यामुळे यामध्ये सर्वपक्षीय आघाडीत शिवसेनेतर्फे बिघाडी करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या आठ उमेदवारांचा विजय झाला असून इतर नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजय झाले आहे.धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल यांनीदेखील या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. तसेच माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वाधिक उमेदवार असल्या कारणाने धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्याच हातात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे