ब्रेकिंग

करोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचं कळताच पत्नीची तीन वर्षाच्या मुलासह आत्महत्या; नांदेडमधील ह्रदयद्रावक घटना!!

नांदेड | पतीचं करोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. नांदेडच्या लोह शहरात ही घटना घडली आहे. महिलेने दोन्ही मुलींना घरी ठेवून तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आई-वडिलांविना मुली पोरक्या झाल्या आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शंकर गदम (40) मूळ आंध्र प्रदेशातील होते. मजुरी करणारे शंकर गदाम हे लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत होते. शंकर गदम यांचा करोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर लोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्‍यान शंकर गदम यांचा मुत्यू झाला. ही घटना समजली असता त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. मंगळवारी मध्यरात्री लहान मुलाला सोबत घेऊन त्यांनी शहराजवळ असलेल्या सुनेगाव तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक करे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे