पाचोरा तहसीलदार यांना रयत क्रांती संघटनेचे निवेदन, संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे.रयत क्रांती संघटना घटनेचा तीव्र निषेध करतो.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी न केल्यास रयत क्रांती संघटना तीव्र स्वरूपाचे महाराष्ट्रभर आंदोलन करेल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.. निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष विजय (पप्पू)पाटील उ.म.अध्यक्ष अरविंद, पाटील,जिल्हा. अ.अशोक पाटील ,योगेश पाटील ता.अ.देवेंद्र पाटील, डॉ. अजय पाटील, आत्माराम राठोड विजय पाटील, खुशाल पाटील, खुशाल भिडे,सुमितबाबा भोसले,उमेश पवार,सतिष मराठे,भुषण पाटील,मनोज पाटील मनोहर चैधरि,प्रकाश पाटील,
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा