धक्कादायक : माणुसकीला लाजवणारी घटना… नराधम पित्यानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार
भिवंडी : बलात्काराचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये.अजूनही बलात्काराच्या घटना राज्यात समोर येत आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि लज्जास्पद अशी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केला आहे. एवढेच नाही तर हि मुलगी गरोदर राहिल्यावर हि धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलगी के केवळ १४ वर्षांचीच आहे. या नराधम पित्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
भिवंडीतील भोईवाडा चाळीत राहणाऱ्या नराधम पित्याने पोटच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीची तब्येत बिघडल्याने तिला तपासणीसाठी धामणकर नका येथे सोनोग्राफी सेंटरमध्ये नेण्यात आले. त्यावेळी हि मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी त्वरित या मुलीच्या वडिलांना आणि तिला भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलिसांनी लगेचच चौकशी करण्यास सुरुवात केली. आणि तिच्या आईलादेखील बोलावून घेतले. या मुलीने आपल्या आईसमोर सांगितले कि दोन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांनीच आपल्यावर शारीरिक अत्याचार केला होता, असे तिने सांगितले.
हि धक्कादायक घटना एकूण सर्वानाच धक्का बसला. या नराधम पित्याला पोलिसांनी बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आणि त्याला ताब्यात घेतले आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



