व्हिडीओ – अधिवेशन सुरू असताना विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने विधानभवानच्या मुख्य द्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे . ही घटना घडत असतानाच पोलीसांनी पुढे येत त्या महिलेला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
आत्मदहन करणाऱ्या युवा स्वाभिमान पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष पदावर त्या कार्यरत आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी त्यांच्या कुटुंबियांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र या प्रकरणी कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला
राजलक्ष्मी असे आत्मदहन करणाऱ्या महिलेचे नाव आहे. नाशिक येथील युवा स्वाभिमान पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष पदावर त्या कार्यरत आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी त्यांच्या कुटुंबियांवर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र या प्रकरणी कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला . या प्रकरणी प्रशासनाकडून कोणते पाऊल उचलण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




