मांजर आडवे गेले तरी … ; नितेश राणेंच्या ‘ म्याऊ म्याऊ ‘ वर शिवसेनेचे सडेतोड प्रत्युत्तर
मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. काल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे यांनी त्यांना ‘म्याऊ म्याऊ ‘ असे म्हणत डिवचले . राणेंच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन राणेंवर हल्लाबोल केला.
कायंदे ट्विटमध्ये म्हणाल्या की, मांजर आडव गेले तरी थांबू नये, ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तंतोतंत पाळली! , असे ट्विट कायंदे यांनी केले आहे. त्यासोबतच, ‘म्याऊ म्याऊ हा हॅशटॅगही त्यांनी वापरला.
राणेंच्या कृत्यावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती . मात्र मनिष कायंदे यांनी ट्विट करुन त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ म्याऊ का केले, यावर राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आदित्य यांना पाहून म्याऊ म्याऊ जाणीवपूर्वक केले. कारण वाघाची मांजर झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी टीका राणे यांनी केली.



