महाराष्ट्र

चिंताजनक बातमी ; नवी मुंबईतील शाळेत तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण!

मुंबई :- राज्यातील शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. अशातच नवी मुंबईतून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील एका शेतकरी विद्यालयात 16 विनवीद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकाच्या मुलाला कोरोना झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.यात 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.१५ डिसेंबरपासून राज्यातील 1ली ते 7वीचे वर्गही सुरू करण्यात आले. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एकाच शाळेत 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शाळेतील काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. महापालिका प्रशासनाकडून संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. महापालिका प्रशासनाने शुक्रवारी दिवसभरात 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली आहे. तर शनिवारी 600 विद्यार्थ्यांच्या चाचणी केली जाणार आहे.

घणसोली येथील शेतकरी समाज शिक्षण संस्थेच्या शाळेत ही घटना घडली आहे. मागील 2 दिवसांत या शाळेत 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. परदेशातून परतलेल्या एका विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. परदेशातून आलेल्या व्यक्तीचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर दोन दिवसात सोळा मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. या मुलांचा चाचणी अहवाल आल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे