आपल खान्देश

कजगावात वीज तारांवरुन पतंग काढताना वीजेचा तीव्र धक्क्याने नऊ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू!!

काजगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आजी-आजोबांच्या गावाला आलेल्या नऊ वर्षीय त्यांच्या नातूला वीज तारांवरुन पतंग काढताना वीजेच्या तीव्र धक्का लागला हाेता. दरम्यान, उपचार सुरु असता या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. दर्शन प्रशांत पाटील असे या मृत बालकाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत असे की, कजगाव येथील ब्रिजलाल दामू पाटील यांच्या अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील मुलीचा तिसरीत शिक्षण घेणारा ९ वर्षीय मुलगा दर्शन प्रशांत पाटील हा दोन दिवसांपूर्वीच कजगाव येथे आजी-आजोबांकडे आला होता. दर्शन ११ रोजी आजोबांच्या घराच्या छतावर पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना त्याचा पतंग छतावरून गेलेल्या विजेच्या तारांवर अडकला. पतंग काढण्याच्या प्रयत्नात दर्शन याला विजेचा तीव्र धक्का बसला.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत तत्काळ चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु, ते जखमी बालकाला वाचवू शकले नाहीत. अखेर उपचार सुरु असताना दर्शन पाटील याने १६ रोजी अखेरचा श्वास घेतला. मृत दर्शन याच्यावर शोकाकूल वातावरणात त्याच्या मूळगावी कावपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने कजगाव व कावपिंप्री परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे