आपल खान्देश

पिंपंळगाव स्मशान भूमी वॉलकंपाऊंड बांधकाम हे निकृष्ट दर्जा, भडगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी चौकशी अर्जांना दाखविली केराची टोपली?

सदर प्रकरण भडगाव पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्याकडे विभाग निहाय चौकशी अर्ज दिला होता, त्याची चोकशी झाली नाहीi

झूम मराठी वृतसेवा

भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बु। ग्रामपंचायत येथील स्मशानभूमी वाल कंपाऊंड बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे काम झालेले असून एस्टिमेट निविदेप्रमाणे काम झालेले दिसून आलेले नाही. सदर प्रकरण भडगाव पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्याकडे विभाग निहाय चौकशी अर्ज दिला होता, त्याची चोकशी झाली नाहीi

पिंपळगाव स्मशानभूमी वॉल कंपाऊंड बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेले असून ग्रामसेवक यांनी काही अधिकारी हाताशी धरून संगनमत करून शासकीय निधीचा रकमेचा अपहार केलेला आहे अशी उघड चर्चा गावात आहे 

सविस्तर वृत्त पिंपळगाव बु।। ता.भडगाव ग्रामपंचायत येथील स्मशानभूमी वाल कंपाऊंड बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे काम झालेले असून एस्टिमेट निविदेप्रमाणे काम झालेले दिसून आलेले नाही.व नोंदणीकृत ठेकेदार कोण? संबंधित कामांमध्ये फार मोठा भ्रष्टाचार अफरातफर झाल्याचे दाट शंका आहे.अर्जदार समाधान जुगराज पाटील पिंपळगाव बु।। यांनी दिनांक २९/४/ २०२१ व १५/११/२०२१ भडगाव पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्याकडे विभाग निहाय चौकशी अर्ज दाखल केला असून पहिला व दुसरा अर्ज यांच्या मध्ये सहा महिन्याचा अंतर असून कुठल्याही प्रकारची चौकशी न करता हेतुपुरस्कृत व बुद्धीपुरस्कृत चौकशी अर्जाची डावलाडावल केली जात आहे.

चौकशी अर्जाच्या प्रती स्वतः गट विकास अधिकारी पंचायत समिती भडगावसह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद जळगाव जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, महसूल आयुक्त नाशिक विभाग नाशिक, ग्रामविकासमंत्री मंत्रालय मुंबई इत्यादी ठिकाणी वरिष्ठ पातळीवर चौकशी अर्जाच्या प्रती दिलेल्या असून स्थानिक पंचायत समिती गट विकास अधिकारी भडगाव यांना दिलेल्या चौकशी अर्जाच्या निवेदनातील त्यांनी बारकाईने अभ्यास करावा तालुका जिल्हा व राज्य पातळीवरील चौकशी अर्जाच्या निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत. संबंधित अर्जाचा कुठलाही विचार न करणे म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी चौकशी अर्जाच्या निवेदनाच्या प्रती गेलेल्या असतील तेवढ्या अधिकारी लोकांचा व पदाधिकारी मंत्री महोदय यांचा अवमान होईल मग पुढे प्रश्न असा उपस्थित होतो की, पंचायत समिती भडगाव गट विकास अधिकारी सर्वस्व आहात का? ते शासक आहेत की प्रशासक वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व मंत्री महोदयांना दिल्या गेलेल्या चौकशी अर्जाच्या निवेदनाची कुठलीही दखल न घेणे,म्हणजेच इतर सर्व अधिकाऱ्यांचा मंत्री महोदय यांचा अपमान करणे होय. हीच आडमुठेपणाची भूमिका दिसून येत आहे. संबंधीत पिंपळगाव बु।।ग्रामपंचायतीच्या हद्दीत व अखत्यारीतील स्मशानभूमी वॉल कंपाऊंड बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेले असून ग्रामसेवक यांनी काही अधिकारी हाताशी धरून संगनमत करून शासकीय निधीचा रकमेचा अपहार केलेला आहे. म्हणून तालुका पातळीवरील देखील अधिकारी यांचाही याच्यामध्ये हात आहे का?अर्जदाराने संबंधित गटविकास अधिकारी भडगाव यांना नम्रपणे सुचित केले की जर माझ्या चौकशी अर्जाचा योग्य तो विचार न झाल्यास मी अस समजेल की, आपण सर्व या प्रकारांमध्ये सामिल व सहभागी आहात, शासकीय योजनांचा संदर्भातील होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामात आपण सर्वजण सहभागी आहात व शासकीय रकमेचा अपहार व भ्रष्टाचार करीत आहात म्हणून मी अर्जदार स्वतः प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे होत असलेल्या प्रकाराबद्दल आवाज उठवावा. शासकीय रकमेचा भ्रष्टाचार थांबावुन आवाज उठवावा. पंचायत समिती कार्यालय भडगाव गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्राणत्याग करेन असे प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे