न्यायडोंगरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात गरुड झेप
नांदगाव(प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील श्री शेत्र शनैशवर सेवाभावी संस्था नांदगाव संचालित स्वर्गीय,(अण्णासाहेब) गंगाधर शिवराम आहेर आदिवासी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा न्यायडोंगरी या शाळेत 14 डिसेंबर 2021 रोजी मंगळवारी शाळेतील विद्यार्थी सचिन वळवी यांनी राज्यस्तरीय 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक ने यश संपादित केले. म्हणून त्याची क्रीडा प्रबोधिनी नाशिक येथे निवड झाली त्याबद्दल सचिन वळवी या विद्यार्थ्यांचा 14 डिसेंबर रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रूपचंद्र महारू अहिरे( माजी ग्रामपंचायत सदस्य) होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री शनेश्वर सेवाभावी संस्थेचे सरचिटणीस एडवोकेट माजी आमदार आणि जात आहेत तसेच गावातील व परिसरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
एडवोकेट अनिल दादा आहेर यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करताना म्हटले की सचिन वळवी या विद्यार्थ्याला भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन भविष्यात जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांनी खेळा मध्ये सहभाग नोंदवावा व प्रकल्प कार्यालयात आपली शाळा अमोल नंबर प्रथम क्रमांक कशी येईल यासाठी सर्व शाळेतील कर्मचारी शिक्षक यांनी प्रयत्न करावेत.
तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी मनपूर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन देखील नांदगाव तालुक्याचे माजी आमदार एडवोकेट अनिल दादा आहेर यांनी केली.
भविष्यात या आश्रम शाळेतून एकापेक्षा अनेक विद्यार्थ्यांनी संपादित करावे यावेळी एडवोकेट अनिल दादा आहेर यांनी सचिनच्या यशाबद्दल क्रीडाशिक्षक रायते सर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सदर कामात कार्यक्रमासाठी न्यायडोंगरी परिसरातील आदिवासी बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा