आपल खान्देशक्रिडा व मनोरंजन

पाचोरा शहरातील साहिल बागुल या खेळाडूने छत्रपती संभाजी महाराज नगर येथील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक पटकवले..

  • दिलीप परदेशी 

पाचोरा टुडे | छत्रपती संभाजी महाराज नगर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत पाचोरा शहरातील एम एम कॉलेज मधील खेळाडू साहिल सागर बागुल याने या प्रकारात 19 वर्षा वरील गटात कांस्य पदकावर आपले नाव कोरले असून त्यांच्या या कामगिरीमुळे सगळीकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

या दैदीप्यमान कामगिरीने महाविद्यालयाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला . या खेळाडुला कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा गिरीष पाटील सर तसेच तायक्वांडो कोच श्री सुनिल मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा भाऊसो दिलीप वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, व्हा चेअरमन नानासो व्ही टी जोशी, संचालक दादासो डॉ जयवंत पाटील कॉलेज कमिटी चेअरमन दादासो सुभाष तोतला प्राचार्य डॉ शिरीष पाटील, उप प्राचार्य डॉ व्ही एस वाले, उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील, उपप्राचार्य प्रा एस एस पाटील पर्यवेक्षक प्रा जे पी बडगुजर कार्यालयीन अधीक्षक नितीन पाटील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी यांनी भरभरून कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे