महाराष्ट्र

पुण्यात अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएची कारवाई, ४५ गाळ्यांवर फिरवला बुलडोजर

उमेश पाटील

पुणे (प्रतिनिधी) मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील गट क्रमांक १८१, २६१ आणि १७२ या ठिकाणाच्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मोठी कारवाई करण्यात आली आहे. वाणिज्य स्वरूपाचे ८२५० चौरस फुटांचे ३० गाळे, ५ हजार चौरस फुटांचे ६ गाळे, ३२०० चौरस फुटांचे गाळे, १७६० चौरस फुटांचे ४ गाळे असे एकूण १८ हजार २१० चौरस फूट क्षेत्रातील ४५ अनधिकृत वाणिज्य गाळे पाडण्यात आले.

स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात पीएमआरडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी गेलं असता, काही जणांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य केलं. तर इतर अनधिकृत बांधकाम धारकांकडून बांधकाम पाडकामाचा खर्च वसूल केला जाणार आहे. पीएमआरडीएच्या क्षेत्रात रितसर परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये, असं आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आलं.

मुळशीत कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी पत्र्याचे शेड होतं. अशा प्रकारच्या बांधकामांचा पीएमआरडीए क्षेत्रात सुळसुळाट झाला असून सर्वच ठिकाणी अशी बांधकामे निष्कासित करण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे