राजकीय

अशोकस्तंभाचं स्टिकर लावणाऱ्या आमदार, खासदारांवर होणार कारवाई

कुणीही राष्ट्रीय चिन्ह वापरू नये आणि वापरत असल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातल्या पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.

आमदार , खासदारांच्या आपल्या गाडीवर सर्रासपणे अशोकस्तंभाचं स्टिकर लावलेली असतात. मात्र, असे स्टिकर लावणे हे बेकायदेशीर असून यापुढे थेट आमदार आणि खासदारांवर देखील कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तांना तसे आदेश दिलेत.

उल्हासनगर येथील राम वाधवा यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात आलेत आहे.अशोक स्तंभ असलेले स्टिकर लावण्याचा अधिकार आमदार आणि खासदारांना नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राम वाधवा यांनी केली होती. देशभरात गाडीवर अशोकस्तंभ लावण्याचे अधिकार हे फक्त पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती, राज्यसभेचे उपसभापती, चीफ जस्टीस आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यांना असतात.मात्र, आमदार आणि खासदार सर्रासपणे असे स्टिकर आपल्या वाहनांवर लावतात. काही आमदार , खासदारांचे कार्यकर्ते देखील वाहनांवर अशोकस्तंभ असलेले स्टिकर लावतात.

त्यामुळे या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान होत असल्याची तक्रार उल्हासनगरचे समाजसेवक राम वाधवा यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती.

याची दखल घेत अधिकार नसलेल्या कुणीही राष्ट्रीय चिन्ह वापरू नये आणि वापरत असल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातल्या पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत. हे एक व्हीआयपी कल्चर आहे, विशेषतः टोल माफी करण्यासाठी, वाहतूक कोंडीतून लवकर बाहेर पडण्यासाठी या स्टिकरचा गैर वापर केला जातो. याबाबत राज्याचे राज्यपाल, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांना तक्रार केली होती, त्यानुसार वाहतूक विभागाचे ऍडिशनल डीजी यांनी एक परिपत्रक काढले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे