महाराष्ट्र

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन कारण्यात आले

 ठाणे दि : इंग्रजांना तब्बल 18 वेळा लढाईत हरवणारा व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेले,भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते,महायुद्धा,महापराक्रमी,महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,ठाणे जिल्हा यांच्या वतीने युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 कोरोनाचे सावट असल्याने महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ,ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित या कार्यक्रमात सुरुवातील महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युनिव्हर्सल पास शिबिराचे उदघाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील,समाजाचे जेष्ठ नेते बाबासाहेब दगडे,उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी,धनगर माझाचे संपादक धनंजय तांदले,भाजपाचे कार्यकर्ते विशाल वाघ,धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर,यशवंत सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष मधुकर गडदे,जय मल्हार ग्रुपचे नरेश शिरगिरे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर दोन लसी घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासासाठी हा युनिव्हर्सल पास मिळत असून हा पास मॉल तसेच अन्य ठिकाणी प्रवेशासाठी उपयोगी पडत आहे.नागरिकांना अशा उपयुक्त ठरणारया युनिव्हर्सल पास उपलब्ध करून देण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर प्रतिष्ठानच्या वतीने युनिव्हर्सल पास शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुमारे १५० नागरिकांनी युनिव्हर्सल पास काढून घेतले.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे,खजिनदार अविनाश लबडे,प्रचारप्रमुख कुमार पळसे,जेष्ठ समाजसेवक प्रसाद वारे,सदाशिव खांडेकर,सल्लागार मनोहर वीरकर,सुनील राहिज,कार्यकारणी सदस्य सुरेश भांड,राजेश वीरकर,अमोल होळकर,अरुण परदेशी,उत्तम यमगर,मनोज खाटेकर ,अजय हक्के,महिला मंडळ सचिव गायत्री गुंड,सदस्य सुषमा बुधे,सुजाता भांड,पूनम बरकडे, जालिंदर पांढरे,अशोक जेडगे,मंगेश पोंदे,सदाशिव धायगुडे,मारुती गाडीकर आदींनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे