ब्रेकिंग

पाचोरा शहरात स्वातंत्र्यदिनी ‘रानभाजी महोत्सव’

झूम मराठी वृत्त

पाचोरा (झूम मराठी) तालुका कृषि अधिकारी व निर्मल सिड्स प्रा. लि., पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट सकाळी ९ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत पाचोरा शहरातील गिरड रोडवरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात फळ रोपवाटीका येथे ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आलेला आहे.

पावसाळा सुरु झाला की शेतात, रानावनात शेकडोंनी रानभाज्या उगवतात, करटोली, घोळ, आंबुशी कुर्डू, केना, सुरण, दिंडा, कुडा, टाकळा, पाथ्री, भुईआवळी, कपाळफोडी, तरोटा, आगडा, उंबर, चिगुर, सराटे, मयाळू अशा किती तरी रानभाज्यांची नावे सांगता येतील. पूर्वजांना या सर्व रानभाज्या माहिती होत्या. त्यांची भाजी कशी तयार करावयाची यांच्या पद्धतीपण माहिती होत्या. आताच्या पिढींना या भाज्यांची ओळखही नाही व त्यापासून भाजी कशी बनवायची, याची माहिती नाही. आपल्या पूर्वजांचा हा ठेवा लुप्त होतो की काय, याची शंका निर्माण होते. ग्रामीण लोकांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने हा महोत्सव होईल. 

या ठिकाणी अनेक शेतकरी, शेतकरी गट रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. महोत्सवात वेगवेगळ्या रानभाज्या पाहायला तर मिळतील, शिवाय त्यांची विक्री पण होईल. या बरोबर भाजीपाल्याच्या पाककृती (रेसिपी) चे प्रात्यक्षिकही दाखविले जाईल. त्यामुळे महोत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर. एन. जाधव यांनी केले.

या महोत्सवासाठी पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे