ब्रेकिंग

किरण शिंदे या युवकाने २६ मार्च २०२३ रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकातील मुतारीसंदर्भात किरण शिंदे या युवकाने तक्रारवहीत होती. रेल्वेने कारवाई करत त्या उद्धटपणे वागणाऱ्या महिलेला कामावरून हटवण्यात आलं आहे.‌ कंत्राटदार रोशनी मल्टी सर्विसेस यांना नागरिकांशी सौजन्याने वागणारा कर्मचारी वर्ग तैनात असावा, म्हणून तंबी देण्यात आली आहे. शिवाय, मुतारीची सेवा मोफत आहे, म्हणून कंत्राटदाराकडून रीतसर फलकही लावून घेण्यात आलाय

एक क्रमांकाच्या फलाटावर कल्याण बाजूस असलेल्या रेल्वेच्या सार्वजनिक मुतारीत १ रुपया मागितल्याबाबतची ती तक्रार होती. शिवाय नकार दिल्यावर तिथल्या देखभाल करणाऱ्या महिलेने किरण यांना शिवीगाळ केली होती. किरण यांच्या तक्रारीनुसार, सदरची महिला नशेत होती.

 

किरण शिंदेंना हा अनुभव सतत तीन दिवस येत होता. २९ मार्च, २०२३ रोजी त्यांनी पुन्हा आपली तक्रार नोंदवली होती. शिवाय, वारंवार तक्रार करून निवारण होत नाही म्हणून त्यांनी समाजमाध्यमाचाही आधार घेतला होता. रेल्वेच्या ट्विटर हॅन्डलवरही त्यांनी घडला प्रकार मांडला होता आणि तिथे प्रतिसादही मिळाला.

 

रेल्वे पोलिस दलाच्या जवानांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली व त्यांना किरण शिंदेंच्या तक्रारीत तथ्य आढळलं. किरण शिंदेंशी उद्धटपणे वागणाऱ्या महिलेला कामावरून हटवण्यात आलं आहे.‌ कंत्राटदार रोशनी मल्टी सर्विसेस यांना नागरिकांशी सौजन्याने वागणारा कर्मचारी वर्ग तैनात असावा, म्हणून तंबी देण्यात आली आहे. शिवाय, मुतारीची सेवा मोफत आहे, म्हणून कंत्राटदाराकडून रीतसर फलकही लावून घेण्यात आलाय.

 

प्रश्न रुपयाचा नव्हता ; पण जी सेवा रेल्वेने मोफत देऊ केलीय, तिथे आपण का पैसे द्यावेत आणि त्यासाठीची दादागिरी सहन करावी, हा खरा मुद्दा होता. वेळ नसतो, घाई असते, कोण ऐकतं वगैरे बहाणे पुढे करत आपण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीत आवाज उठवणं टाळतो. अव्यवस्था त्या उदासीनतेमुळेच भेसूर रुप धारण करते.

 

किरण शिंदे यांनी वेळीच आवाज उठवला. एका जागरूक भारतीय नागरिकत्वाचं कर्तव्य त्यांनी निभावलं. कायद्याने वागा लोकचळवळ किरण शिंदे यांचं जाहिर अभिनंदन व कौतुक करते. समाजात किरण शिंदे वाढायला हवेत, अशी मनोकामनाही करते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे