महाराष्ट्र

शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक, अत्यावश्यक सुविधांना वगळले

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या निषेधार्थ महा आघाडीच्या वतीने उद्या ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद ’ची हाक देण्यात आली आहे

Published by Nilesh Patil

लखीमपूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. भाजपकडून मारेकऱ्यांचा बचाव करण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे.


उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी शनिवारी संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा केली.लखीमपूरमधील घटनेवरून राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असून सोमवारच्या बंदमध्ये त्या निश्चितपणे दिसतील, असा दावा शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रपरिषदेत केला. राऊत म्हणाले, शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे. लखीमपूरमध्ये संविधानाची हत्या झाली. अन्नदाता शेतकऱ्याला संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. महाविकास आघाडी भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे कडकडीत बंद पाळून दाखवून देऊ. लोक स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील.

पाचोर्यात बंद चे महाविकास आघाडी चे आवाहन

महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले असुन यात पाचोरा शहरातील सर्व व्यापारी बंधुंनी सहकार्य करण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अझर खान, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ८ वाजता महाविकास आघाडी तील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

जीवनावश्यक सुविधांना बंदतून वगळण्यात आले आहे.नवाब मलिक म्हणाले, लखीमपूरची घटना जलियानवाला बाग हत्याकांडासारखी आहे असे आमचे नेते शरद पवार यांनी म्हटलेलेच आहे. शेतकऱ्यांची हत्या घडवून आणणाऱ्या पक्षाला बंदद्वारे चोख उत्तर दिले जाईल. रविवारी मध्यरात्रीनंतरच बंद सुरू होईल. सचिन सावंत म्हणाले, लखीमपूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. भाजपकडून मारेकऱ्यांचा बचाव करण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे