महाराष्ट्र
स्थानिक आमदार विकास निधीतून पिंप्राळे गावाच्या विकास कामासाठी दहा लाख रूपये मंजुर!
नांदगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे गावाच्या विकास कामासाठी नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंप्राळे गावातील मंदिरासमोर सभागृह साठी सुमारे दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले.
या सभागृहाचे भूमिपूजन शिवसेनेचे नांदगाव शहर प्रमुख सुनील भाऊ बागुल, जाधव तसेचआदिवासी समाज व संघटक भाऊराव भाऊ बागुल, यांच्या हस्ते संपन्न झाले. या सभागृहाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिवसेना पदाधिकारी, व कार्यकर्ते आदींसह पिंप्राळे गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


