धुळे (दिलीप परदेशी) दिवाळीनंतर तुलसीविवाह पर्व संपल्यानंतर लगेचच लग्नसमारंभ सुरू झाले आहेत शहरासह ग्रामीण भागात सध्या लग्न जुळवण्याचा हंगाम सुरू आहे .
सर्वत्र साखरपुडा लग्न जमवणे व जमवलेल्या लग्नाचा बार उडविण्याचे काम काही प्रमाणात सुरू आहे परंतु मुलींचे प्रमाण हजारांच्या मागे सातशे असे झाल्याने ग्रामीण भागातील नवरा मुलाला नवरी मिळेना नक्की झाली आहे.
काही वर्षापासून मुलींच्या जन्मदरात घट झाली आहे त्याचा परिणाम आता सोसावा लागत आहे .वय उलटूनही विवाहाचा योग जोडून येत नसल्याने निराशेचे चित्रही निर्माण झाले आहे दुसरीकडे लग्न जुळवण्याच्या प्रयत्नात फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत वाढत्या अपेक्षा आकांक्षा मुळे अलीकडे विवाह करणे पूर्वीसारखे सोपे राहिले नाही.
आता मुलींचे लग्न १८ ते २० वर्षे वय होईपर्यंत मुली संगणक शिलाई शिलाई काम ब्युटीपार्लर नर्सेस असे कोर्स पूर्ण करून रोजगार उपलब्ध करत आहेत .काही मुली तर बीएड डीएड डॉक्टर इंजिनीअर वकील पोलीस अधिकारी कर्मचारी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत .
पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या नोकरी करताना दिसतात तर काही महिलांनी मोठ्या पदाच्या नोकर्या मिळवल्या आहेत .
त्यांना चांगल्या जोडीदाराची अपेक्षा असते दुसरीकडे मुलांचे विवाह होणे दिवसेंदिवस चिंताजनक ठरत आहे ग्रामीण भागात हे चित्र विदारक आहे .
मुलींचा घटता जन्मदर आणि आता हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला ,अशी विनवणी करण्याची वेळ नवऱ्या मुलाची आली आहे .
एक तर मोठ्या प्रमाणात झालेली दोन भ्रुनहत्या व गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे ग्रामीण भागातील नवऱ्या मुलाला लग्न जमविताना अडचणी येत असल्याचे चित्र आहे .
लग्नाचे वय निघून जात असताना मुलगी मिळत नसल्याने अनेक कुटुंबांमध्ये बेचैनी ची अवस्था दिसून येत आहे.
मुलगी बघायला गेलेल्या मुलाचा बाप दबक्या आवाजात आपल्याला हुंडा नको फक्त मुलगी हवी असे मत ज्येष्ठ माणसांना सांगताना दिसतो दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील मुलगी सुद्धा लग्नाची घाई न करता शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
बहुसंख्य व्यसनाधीन तरुणांना मुलींनी नाकारल्याने नापसंत करण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे उपवर मुलांनी एक प्रकारची धास्ती घेतली आहे एकीकडे महागाईचा पारा वाढल्यामुळे तसेच धावपळीच्या युगात वेळ नसल्यामुळे झटपट लग्न उरकल्यावर मध्यस्थी मंडळी भर देत आहेत तर दुसरीकडे मोठ्या धामधुमीत विवाह समारंभ देखील पार पडत आहे.
या सर्व गोष्टींचा विचार केला असता एकच लक्षात येते बेरोजगारीची बिडी जमेना लग्नाची जोडी
शेतकरी नवरा नको ग बाई
गेल्या काही वर्षांपूर्वी मुले आणि मुली यांच्या संख्येमध्ये तफावत होऊ लागल्याने वयात आलेल्या तरुणांची लग्ने रखडत आहेत आता देखील ग्रामीण भागातील तरुणांची लग्न अनिश्चित काळासाठी या कारणांमुळे लांबणीवर पडत आहेत त्यातच ग्रामीण भागातील मुलींकडून मुलगा सुशिक्षित असला तरी केवळ शेतकरी आहे म्हणून नाकारले जात आहे . नाकारण्याचा हा प्रकार खरंच बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीची केवळ एक झलक दाखवणारा आहे. काहींनी गाठली तीसी तरी लग्न जमेना……
दरवर्षी ज्योतिषाकडे जाऊन या वर्षी तरी योग आहे का हे विचारण्याचा धडाका सुरूच आहे .वर्षानुवर्षे त्यात वय वाढत चालले आहे गावागावात हे चित्र दिसून येत आहे मुला-मुलीत जास्त अंतर असेल तर लग्न जमेलच कसं असं करत करत आज प्रत्येक गावात ४०ते ५० नवरदेव बाशिंग घेऊन तयार आहेत परंतु मुली काही मिळायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा