आपल खान्देश

‘अबकी बार महेंगाई पे वार’ ; पाचोरा येथे केंद्र सरकारचा निषेध

पाचोरा येथील तहसील कार्यलयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

झूम मराठी पाचोरा – केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅस, पेट्रोल, व  डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मा आ दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात पाचोरा येथील तहसील कार्यलयासमोर निषेध नोंदवत ‘अबकी बार महेंगाई पे वार’ म्हणत, आंदोलन करण्यात आले. तसेच  यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अश्या विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे. तरी सर्व प्रकारच्या इंधनाचे भाव त्वरित कमी करण्यात यावे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असून या महागाईची झळ सर्व सामान्य जनतेला सोसावी लागत आहे. या बाबत केंद्र शासनाने नियोजन करुन दरवाढ नियंत्रित करावी. यावेळी निवेदन देताना माजी आ. दिलीप वाघ, तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, सत्तार पिंजारी, नाना देवरे, प्रकाश पाटील, बशीर दादा, रामधन परदेशी, सय्यद तारीख, भोला आप्पा, रणजित पाटील सर, भगवान मिस्तरी, डी एस पाटील, हारुन दादा देशमुख, गौरव वाघ,अविनाश सुतार,अभिजीत पवार, मौजू शेठ, पंकज गढरी,पिंटू भामरे,सुदर्शन सोनवणे, सचिन शिंदे,जय सुतार, विक्रांत पाटील सर, किरण देवरे, शांताराम भुजबळ, गोपी पाटील, अविनाश सुतार, प्रशांत माळी, रज्जू बागवान, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ZOOM Advertising

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे