आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उद्या भव्य मोफत आरोग्य मेळावा


पाचोरा (झूम मराठी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळावा उद्या दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे.

या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी व सर्व सुविधा मोफत दिल्या जातील. यात डिजीटल हेल्थ आय. डी. (युनिक हेल्थ आय.डी.) आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात येणार असुन याकरिता आवश्यक कागदपत्रे  पासपोर्टसाईज दोन फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व मुळ कागदपत्र व सोबत झेरॉक्स प्रत्येकी दोन प्रती) आवश्यक आहेत. सर्व रोग मोफत तपासणी (विशेष तज्ञ डॉक्टरांमार्फत) हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुप्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी, लहान मुलांचे आजार, किडणी आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान, नाक, घसा आजार, अस्थिरोग, एच. आय. व्ही. तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग व सर्व आजार मोफत रक्त, लघवी, एक्स – रे व ई. सी. जी. गरजु रुग्णांना आवश्यकते नुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतगत मोफत दिले जातील. आयुर्वेद विभाग अंतर्गत मोफत तपासणी तसेच निरोगी जीवनशैली विषयी आहार, योगा व इतर सल्ला आणि मार्गदर्शन करणार आहेत. तसेच किशोर वयातील मुला – मुलींसाठी, कुमार अवस्थेतील बालकांच्या समस्या या विषयी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबीर तसेच नेत्रदान, अवयवदान, देहदान, संबंधी स्वयं इच्छापत्र भरून घेतले जाणार आहेत. या आरोग्य मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खा. उन्मेष पाटील, पाचोरा – भडगांव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच सहकार्य सदस्य जिल्हा परिषद व पंचायत समिती, पाचोरा नगरपरिषदचे मा. नगरसेवक, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व वैद्यकिय अधिकारी, प्रा. आ. केंद्र व ग्रामीण रुग्णालय, पाचोरा तालुका डॉक्टर असोसिएशन, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. किरण पाटील, जि. प. आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित राहणार आहेत. या आरोग्य मेळाव्यात सहभागी होऊन आरोग्य संबंधित योजनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे