झूम मराठी – मुक्ताराम बागुल नांदगावं प्रतिनिधी
मनमाड | कोरोनामुळे २० महिन्यांपासून बंद अनारक्षित पॅसेंजर रेल्वे टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होत आहे. १५ नोव्हेंबरपासून पुणे-मनमाड-औरंगाबाद-जालना-परभणी-निजामाबाद ही अनारक्षित पॅसेंजर सुरू होणार आहे. तसेच पुणे-सोलापूर, कुर्डूवाडी-कोल्हापूर या ठिकाणच्या प्रमुख पॅसेंजरही सुरू होत आहेत. २० महिन्यांपासून बंद सर्वसाधारण तिकीटही आता या गाड्यांसाठी दिले जाईल
दौंड-निजामाबाद डेमू अनारक्षित ट्रेन सोमवारपासून सुरू होत आहे. दौंडहून सायंकाळी ४.४५ वाजता निघणारी ही गाडी येवल्याला रात्री ९ ला, मनमाड रात्री १०.४५ वाजता, औरंगाबाद दुसऱ्या दिवशी पहाटे १२.४५ वाजता, जालना २.१३ वाजता, परभणीला ४.३८ वाजता, नांदेड ५.५८ वाजता तर निजामाबादला सकाळी १०.४० ला पोहाेचेल.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा