पठाणकोट येथील नक्षलवादी हल्ल्यात, सावखेडा बुद्रुक येथील जवान शहीद सावखेडा गावावर शोककळा
पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील पस्तीस वर्षीय जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी वय ३५ हे सेवा बजावत असतांना पठाणकोट येथे काल रात्री झालेल्या नक्षलवादी हल्यात शहीद झाले आहेत.
मंगलसींग परदेशी हे शहीद झाल्याची वर्ता कळताच वरखेडी, डांभूर्णी, पिंप्री, पिंपळगाव हरेश्वर, कुऱ्हाड, लासुरे, अंबे वडगाव, लोहारी, शिंदाड आसपासच्या जवळपासच्या गावात शोकमय वातावरण झाले आहे.
पाचोरा तालुक्यातीचे आमदार, माजी आमदार, पंचायत समितीचे सदस्य मा.श्री. मधुकर काटे वरखेडीचे मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार व इतर लोकप्रतीनिधींनी त्याचे दैनंदिन कार्यक्रम त्वरित थांबवून सावखेडा गावात हजेरी लावत शहीद कुटुंबीयांच्या दुःखात सामिल झाले आहेत. पाचोरा येथील मा.श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठरलेले कार्यक्रम जवळपास थांबवण्यात आले असून तेही सावखेडा गावाकडे निघाल्याचे समजते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा