आपल खान्देश

खडकदेवळा परीसरातून बैल आणि गाय चोरीस गेली!

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु|| येथील राजाराम दगा देवरे खडकदेवळा बु| यांच्या वाडयातील बैल व गाय अज्ञात चोरट्यांनी रात्री 3 ते 4 वाजेच्या सुमरास चोरी केली आहे...

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकरी राजाराम दगा देवरे खडकदेवळा बु| यांच्या वाडयातील बैल व गाय अज्ञात चोरट्यांनी रात्री 3 ते 4 वाजेच्या सुमरास चोरट्यांनी चोरी केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. काही महिन्यांत परिसरात बैल चोरीची ही तिसरी घटना आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, बैल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी राजाराम दगा देवरे यांनी आपल्या मुलांप्रमाणे या जनवराना प्रेम दिले होते. असे झूम मराठीशी बोलताना ते हळहळत होते. या परिसरात सर्वच शेतकरी पाळीव जनावरे वाड्यात किंवा शेतातच  ठेवतात. या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव जनावरे चोरांची टोळी या परिसरात कार्यरत झाल्याचे दिसते, बैल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे