आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

एन. मुक्ता या संघटनेने उच्च शिक्षण विभाग, पुणे यांनी काढलेल्या तुघलकी परिपत्रकाची केली होळी!

झूम मराठी

जळगाव – सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग जळगाव यांना अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संचलित एन. मुक्ता. या प्राध्यापक संघटनेने दिनांक ०७.०७.२०२२ रोजी माननीय संचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांनी काढलेल्या तुघलकी परिपत्रक संदर्भात निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदविण्यात आला. सदरचे निवेदन माननीय हेमंत देवरे यांनी सहसंचालक, जळगाव यांच्या वतीने स्वीकारले व त्यांनी संघटनेच्या भावना माननीय संचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या कार्यालयास कळवण्यात येतील असे आश्वासन दिले. तदनंतर एन. मुक्ताच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देऊन माननीय सहसंचालक, उच्च शिक्षण जळगाव विभाग यांच्या कार्यालयासमोर जाहीर निषेध नोंदवून सदर परिपत्रकाची होळी करण्यात आली. याप्रसंगी एन. मुक्ता संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. नितीन बारी, सचिव प्रा. डॉ. अविनाश बडगुजर, जळगाव जिल्हा सचिव प्रा. डॉ. अजय पाटील, उपाध्यक्ष प्रा डॉ. गोविंदा मारतळे, प्रा. मारुती जाधव, प्रा. डॉ. इंदिरा पाटील, प्रा. डॉ. गीता पाटील, डॉ. कांचन महाजन, प्रा. जे बी पाटील, प्रा. सुरेश कोळी, डॉ. अनिल बारी, डॉ. संजय पाटील, डॉ. जे डी गोपाळ, डॉ. आशुतोष वर्डीकर, डॉ. भालचंद्र देशमुख, प्रा. प्रसाद निकुने, प्रा. केतन महाजन, प्रा. सुरेश कांबळे, प्रा. भूषण कवीमंडळ, प्रा. डॉ. नितीन बडगुजर, डॉ. गजानन जाधव, प्रा. हितेश ब्रिजवासी इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे