जयकिरण प्रभाजी इंग्लिश मीडियम शाळेत साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्त अभिवादन
पाचोरा तालुक्यात प्रसिद्ध शाळा जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे प.पु. महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कर्याची महती सांगून त्याचे विचार मांडून स्मृती जागविण्यात आल्या,
या वेळी शाळेतील विद्यार्थी जिनिषा संघवी , अक्षरा बाफना कनिष्कां जैन, लिशा जैन, मुदित धाडीवाल या विद्यार्थ्यांनी महाराज साहब यांच्या कार्याबदद्ल माहीती सांगुन नवकार मंत्राचे उच्चारण केले.तसेच सौ.वैशालीजी रीतेशजी ललवाणी यांनी किरण प्रभाजी महाराज साहब यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेशजी बोथरा, उपाध्यक्ष श्री गिरीषजी कुलकर्णी, सचिव श्री जीवनजी जैन, खजिनदार जगदीशजी खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन श्री लालचंदजी केसवाणी, स्कूल कमिटी सचिव श्री रितेशजी ललवाणी, संचालक श्री. प्रभुलालजी शर्मा आणि सौ .वैशालीजी रितेशजी ललवाणी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता पाटील मॅडम सी. ई.ओ. श्री अतुल चित्ते पर्यवेक्षिका सौ विद्या थेपडे मॅडम हे उपस्थित होते कार्यकमाचे सुत्रसंचालन सौ.पिंकी जैन मॅडम यांनी केले. कार्यकमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


