राजकीय

कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा गुलाबाने कव्वाली गात राहावी-नितेश राणे

नितेश राणे यांच्या ट्वीटमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

 शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातल्या एका कार्यक्रमात चक्क कव्वाली गात रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. यावेळी त्यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गायली. गुलाबराव पाटील यांना सभा गाजवणारे नेते म्हणून ओळखले जाते. मात्र यावेळी त्यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गात आपल्यातील नवा हुनर त्यांनी दाखवून दिला. मात्र आता यावरच भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.

सुपारी चोर गुलाब पाटीलसाठी हा योग्य कार्यक्रम आहे. इतर वेळेला कुत्र्यासारखं भुंकण्यापेक्षा या भाडखाऊ गुलाबाने कव्वाली गात राहावी, असं सगळं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण जास्त येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान नितेश राणे यांच्या ट्वीटमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावरून शिवसेना भविष्यात एमआयएम पक्षाच्या दिशेने जाऊ शकते, असे भाकीत त्यांनी ट्वीट करत वर्तविले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे