तारखेड्यात जगदंबा देवीच्या यात्रे निमित्त बैलगाडी शर्यत (शामिगोंडा) उत्साहात पार पडला.
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील तारखेडा खू| येथील जगदंबा देवीची यात्राला ऐतिहासिक वारसा आहॆ. तालुक्यात प्रसिद्ध यात्रा मानली जाते बुधवार दिनांक १६ फेब्रुवारीला देवीची यात्रा आणि १२ गाड्या ओडल्या गेल्या, शुक्रवारी १८ फेब्रुवारीला बैलगाडी शर्यतिचा (शामिगोंडा) भव्य दिव्य असा सामना रंगला,या सामन्याचे प्रथम येणाऱ्याला पाचोरा काँग्रेस शहराध्यक्ष अँड.अमजद पठाण आणि सुमित किशोर पाटील यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. व द्वितीय येणाऱ्याला मा.ग्रा.पं. सदस्य.नासेर खा लालखा पठाण यांचा स्मरणार्थ व सर्व ग्रा. पं सदस्य यांचा तर्फे बक्षीस व सन्मान चिन्ह देण्यात आले. या वर्षी यात्रेचा निमित्ताने गावकरी आणि भक्ता मध्ये उत्साह दिसून येत होता.

यात्रे निमत्त जगदंबा देवीचा मंदिराला रंग रंगोटी करून विद्युत रोषणाई व फुलांची आरास सजविण्यात आले होते. तारखेडा “खु” ग्रामपंचायतचे नव नियुक्त सरपंच पती श्री. नवल गुजर, उप ,सरपंच श्री. डी.के. पाटील, सदस्य. संजय गोसावी, पिंटू मराठे, राजेंद्र पाटील, सुनील नाईक, तसेच गावातील वरिष्ठ व गावकऱ्यांनी अनमोल सहकार्य केले.




