गुन्हेगारी

आरोपीच्या बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; IPS पोलीस अधिकाऱ्याकडून 25 वर्षीय युवतीवर बलात्कार!

पुण्यातील कोथरूड परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 25 वर्षीय तरुणीवर PSI पदावरील पोलीस अधिकाऱ्याने लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीनं आपलं पहिलं लग्न लपवून ठेवून फिर्यादीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

प्रवीण नागेश जर्दे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. संशयित आरोपी जर्दे हा सध्या येरवडा पोलीस वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला पुणे शहर आणि आसपासच्या विविध ठिकाणी नेत जबरदस्तीने अनेकदा बलात्कार केला आहे. पीडित तरुणीनं आरोपीकडे लग्नाची मागणी केल्यानंतर टाळाटाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

संशयित आरोपी प्रवीण जर्दे याची 2018 साली पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. मे 2020 मध्ये एका गुन्ह्याचा तपास करत असताना, एका आरोपीच्या बहिणीसोबत जर्दे याची ओळख झाली होती. आरोपीनं पहिलं लग्न झाल्याचं लपवून ठेवत फिर्यादीशी ओळख वाढवली. तसेच तिला लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर अनेकदा बलात्कार केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे