पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे, गोराडखेडा, कुऱ्हाड शिवारात भेट देऊन अतिवृष्टीने बाधित क्षेत्राची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांशी चर्चा केली व क्षेत्रीय यंत्रणांकडून पंचनाम्याची माहिती घेतली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या मालाची शेतकऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकार्यांनी सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
याच बरोबर परिसरात दोन दिवसात पडलेल्या पावसाची नों २१४ मी. मी. झालेली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाधित मालाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या मालाची शेतकऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकार्यांनी सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांसमोर नुकसानीचे पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या कपाशी पिकाच्या काळ्या पडलेल्या कैऱ्या व बोंडे जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले.
यावेळी पाचोरा तहसिलदार कैलास चावडे, जि. प. सदस्य दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, तलाठी बी. एम. परदेशी, तालुका कृषी अधिकारी अशोक जाधव,सरपंच कैलास भगत, सदस्य कौतिक पाटील व परिसरातील शेतकरी या वेळी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा