पाचोरा तालुक्यात आज पहाटे पासून पाऊसाने तालुक्याला चांगलेच झोडपले या पावसामुळे वडली ते वावडदा महामार्गावरील पुलाचा भराव एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा वाहून गेल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला
आज सकाळी 5 वाजे पासून पाचोरा तालुक्यात प्रचंड विजांच्या तांडवात मुसळधार पावसाने पाचोरा शहरास परिसराला झोडपून काढले. शिवाय गोराडखेडा, सामनेर, नांद्रा, वडली आदी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पाचोरा शहरात पहाटे पाच वाजेपासून सकाळी ७.३० वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. गत आठवड्यात झालेल्या पावसापेक्षाही यावेळी पावसाचा जोर जास्त दिसून आला. यामुळे शहरासह तालुक्यातील नदी, नाले वाहून निघाले. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडली ते वावडदा महामार्गावरील पुलाचा भराव एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा वाहून गेल्याने वाहतुकीला मोठा फटका बसला. पहाटेपासून उशिरापर्यंत या पुलावरुन पाणी वाहत होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुक थांबविण्यात आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतही पाण्याचा जोर कायम असल्याने वाहनधारकांनी अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा