आपल खान्देश

पाचोरा तालुक्यात साजगाव कुर्हाड मार्गावर असलेला पूल शेवटची घटका मोजतोय..

पाचोरा (निलेश पाटील) पाचोरा तालुक्यात मौजे साजगाव उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे पाचोरा लोहारा साजगाव कुर्हाड मार्गावर असलेला पूल शेवटची घटका मोजतोय कोणत्याही वेळेस जीवित हानी होण्याची शक्यता! शासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा

पाचोरा तालुका मौजे साजगाव येथे 27 तारखेला आलेल्या उतावळी नदीचे पुराचे पाणी गावातील पाच ते सहा घरकुला मध्ये घुसल्यामुळे घराचे नुकसान झाले जिवनपयोगी वस्तु वाहुन गेल्यामुळे त्या लोकांची परिस्थिती बिकट झाली! तसेच पाचोरा लोहारा कुराड मुख्य रस्ता साजगाव मार्गे जातो उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे तीस वर्षांपूर्वीचा बांधलेला पूल शेवटची घटका मोजत आहे कोणत्याही वेळेस पूल पडू शकतो मोठे वाहन जाऊ शकत नाही कारण पुराचे पाणी जास्त आल्यामुळे पुलाचे कडपे व मधला सिमेंट चा भाग वाहून गेला आहे मोठमोठे खड्डे पडले आहेत मोटर सायकल वाले कसरत करून खड्डे वाचवून रस्ता पार करित आहे ग्रामपंचायत ची जुनी विहिरीचे कठडे तुटले आहेत मौजे साजगाव येथील सरपंच समाधान सोनवणे उपसरपंच उषाताई राजपूत सदस्य गुरुलाल पवार गिरीश पाटील तसेच पोलीस पाटील भगवान पवार गावातील आजी माजी पदाधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन ग्रामसेवक वासुदेव पाटील व साजगाव येथील तलाठी किरण मेद यांच्याशी संपर्क साधून गावातील चार-पाच नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून तत्काळ माहिती वरील विभागाकडे दिली असे झूम मराठी मीडियाशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे