Maharashtra Zilla Parishad Election: जिल्हा परिषदांची निवडणुका जाहिर दोन टप्यात होणार निवडणुका..!

महानगरांमध्ये निवडणुका संपताच, ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यात जादा आरक्षणाचे (५० टक्क्यांहून अधिक) प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत, ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, तिथे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात कायदेशीर पेच नसलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल, तर उर्वरित २० जिल्हा परिषदांचा निर्णय न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर घेतला जाईल.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार असून 5 फेब्रुवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झालं असून मतदारसंघात आचारसंहिता जाहीर झाली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदेचे आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत त्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार असून 12 जिल्हा परिषदेचे आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित 20 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.



