जळगाव ता रावेर (चिनावल) | कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेला संसर्ग आणि त्यामुळे होत असलेल्या मृत्यूंमुळे सर्वसामान्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य लोक, शेजारीपाजारी, नातेवाईक आणि अगदी कुटुंबातील लोकही आपल्या जवळच्या लोकांना घरात घेत नाहीत. त्यामुळेच दूरच्या शहरातून येणाऱ्या नातेवाईकांच्या जवळ जाण्यास किंवा त्यांना घरात घेण्यासही लोक घाबरत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सुमनबाई प्रभाकर मालखेडे ह्या चिनावल येथे राहणाऱ्या वृद्ध महिलेचा सात मे रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 12 दिवसांनी सुमनबाई कोरोनातुन बऱ्या झाल्या. यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलांना फोन केला. तुमच्या आई बऱ्या झाल्या आहेत. तुम्ही येऊन आईला घेऊन जा. असं सांगितल्यावर उद्या येतो असं मुलांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितलं.
मात्र, दुसऱ्या दिवशी मुल आईला घेण्यास आलेच नाहीत. आरोग्य अधिकाऱ्यांनी वारंवार फोन करूनही मुलांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
चार मुलांनी आईला घरात घेण्यास नकार दिला…
कोरोना मुक्त आईला दोन दिवस होऊन ही मुलं रुग्णालयात घेण्यासाठी येत नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी चिनावल येथील सरपंच भावना बोरोले यांना संपर्क साधला. सरपंच बोरोले यांनी पतीच्या मदतीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून सुमनबाईंना चिनावल गावात आणण्यात आलं. घरात सुनेला आणि नातूलाही कोरोना झाला आहे, घर लहान आहे असं सांगून चारही मुलांनी आईला घरात घ्यायला नकार दिला. चारही मुलं वीट भट्टीवर काम करतात.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा