शरण खन्ना
डोंबिवली : साकीनाका बलात्कार प्रकरणी देशभरातून सांताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पुण्यातील वानवडी बलात्कार प्रकरणातही अद्याप चौकशी सुरु आहे. वानवडी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्काराची हि प्रकरणे ताजी असतानाच मुंबईतील डोंबिवली परिसरात देखील एका पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरात हि घटना घडली आहे. १४ वर्षीय मुलीवर जवळपास ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. या आरोपींपैकी २२ जणांना मनमाड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे त्याने तिला सतत ब्लॅकमेल केले. बल्कमेल करून त्या प्रियकराने तिला फार्म हाऊसवर नेले. आणि तेथे आरोपींकडून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
या घटनेची माहिती काल उघडकीस आली आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी चौकशी सुरु केली असून २२ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा