आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोरा शहरातील श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे विविध कार्यक्रम संपन्न.


झूम मराठी

पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, डॉ. नितीन बच्छाव शिक्षणाधिकारी जिप जळगाव, संस्थेचे संचालक सतीश चौधरी, योगेश पाटील, मुख्याध्यापिका सौ. पी.एम. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तराचे वाटप करण्यात आले.

शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव साहेब यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या ग्रंथालय व संगीत हॉलचे उद्घाटन करण्यात आले. वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे