Pachora | पाचोरा कृ.उ.बा.समितीच्या वरखेडी गुरांच्या आठवडे बाजाराचे विक्रमी उत्पादन – सभापती गणेश पाटील
महिनाभरात बाजार समितीच्या उत्पादनात चक्क 1,18,180 एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहॆ
पाचोरा (झूम मराठी) कृषी उत्पन्न बाजार समिती अधिपत्याखाली वरखेडी येथे आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी गुरांचा बाजार भरविण्यात येतो.यात राज्यभरातून गुरे खरेदी-विक्रीसाठी आणली जातात. या व्यवहारातून विक्रमी उत्पन्न मिळाले अशी माहिती पाचोरा कृ.उ.बा.चे सभापती प्रा.गणेशबापु पाटील यांनी दिली.
वरखेडी येथे आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी गुरांचा बाजार भरविण्यात येतो.यात राज्यभरातून गुरे खरेदी-विक्रीसाठी आणली जातात. लाखो रूपयांच्या उलाढालीतून बर्यापैकी उत्पादन पाचोरा कृ.उ.बा.समितीस प्राप्त होत असते. वरखेडी येथील गुरांच्या बाजाराचे उत्पादन नविन संचालक मंडळ येण्यापूर्वी कमी प्रमाणात येत असल्याची माहिती प्राप्त होताच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा कृ.उ.बा.समितीचे सभापती प्रा.गणेशबापु पाटील, उपसभापती पी.ए.पाटीलसर यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाने योग्य नियोजन करून वैयक्तिक गुरांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर लक्ष केंद्रीत केले व योग्य त्या सुचना कृ.उ.बा.चे सचिव बी.बी.बोरूडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत योग्य नियोजन करून त्यांना कृ.उ.बा.चे उत्पादन वाढीसाठी योग्य त्या सुचना दिल्या नव्हेतर स्वत: सभापती-उपसभापती व संचालक मंडळाने प्रत्यक्ष भेट देखिल दिली. याचे फलश्रृत म्हणून दि.22 जून गुरूवार रोजी बाजार समितीच्या उत्पादनात चक्क 1,18,180 एवढे उत्पन्न प्राप्त झाले.
यासंदर्भात कृ.उ.बा.चे सभापती प्रा.गणेशबापु पाटील यांनी मागील व चालू उत्पादनाबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की,दि.25 मे 2023 रोजी 62,411 रू., दि.01 जून 2023 रोजी 78,757 रू., दि.08 जून 2023 रोजी 75,852 रू., दि.15 जून 2023 रोजी 81,311 रू. असे उत्पादन गेल्या 4 गुरूवारचे होते. तर नुतन संचालक मंडळाने उत्पादनासंदर्भात लक्ष केंद्रीत करताच अवघ्या एकाच दिवसात म्हणजे दि.22 जून 2023 रोजी 1,18,180 रू.एवढे उत्पन्न प्राप्त झाल्याचे सभापती प्रा.पाटील यांनी सांगितले. भविष्यात उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अशीच वाटचाल सुरू राहणार असून बाजारात येणार्या गुरांसाठी शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गुरे विक्रीसाठी बाजारात येणार्या घटकांसाठी विविध सोई-सुविधा, गाड्यांची पार्कींगसह इतर संपूर्ण सोयी-सुविधा देखिल पुरविण्याचा मानस असल्याचे कृ.उ.बा.सभापती प्रा.गणेशबापु पाटील यांनी बोलतांना सांगितले. विद्यमान संचालक मंडळ व कृ.उ.बा.सचिव बी.बी.बोरूडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी कृ.उ.बा.च्या उत्पादन वाढीसाठी लक्ष केंद्रीत केल्याबद्दल ध्येय न्यूज परिवारातर्फे व पाचोरा न्यूज मीडिया मन:पूर्वक अभिनंदन.
पत्रकारितेच्या नावाने गुराचे शेण खाणार्या भामट्याविरूध्द तक्रार असल्यास संपर्क साधा-संपादक संदीप महाजन



