आपल खान्देशराजकीय

पाचोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस नागरिकांचा वाढता प्रतिसाद

अडचणी व समस्या मांडून ग्रामस्थांकडून न्यायाची मागणी होत आहॆ..


पाचोरा_भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कॄउबा समितीचे प्रशासक दिलीप वाघ यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेस गावोगावी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आपल्या समस्या व अडचणी मांडून ग्रामस्थ न्यायाची मागणी करीत आहेत.

पाचोरा तालुक्यात गेल्या 2 ऑक्टोबर रोजी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, संजय वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, यांचेसह जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कनाशी (ता भडगाव) येथून दिलीप वाघ यांच्या जनसंवाद यात्रेस प्रारंभ झाला. दररोज सकाळ व सायंकाळ विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी व समस्या समजावून घेऊन , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे समजावून देऊन भडगाव तालुक्यातील संपूर्ण गावे पूर्ण केल्यानंतर पाचोरा तालुक्यात जनसंवाद यात्रेचा झंझावात सुरू आहे. नगरदेवळा बाळद जि प गटातील दिघी, बदरखे ,वडगाव ,नेरी, सार्वे, पिंप्री, खाजोळा ,भोरटेक आदी गावांमध्ये जनसंवाद यात्रा पोहोचली. यात दिलीप वाघ यांचे सह संजय वाघ, नितीन तावडे, विकास पाटील ,विलास भामरे, पंकज गढरी, अभिजीत पवार ,युवती अध्यक्ष ॲड अभिलाषा रोकडे, हरीश पाटील, तेजस पाटील, निकिता राजपूत या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत ग्रामस्थांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या जनसंवाद यात्रेस ग्रामस्थांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले. गरदेवळा – बाळद जि प गटात जनसंवाद यात्रे प्रसंगी ग्रामस्था समवेत दिलीप वाघ, विकास पाटील, नितीन तावडे, अभिलाषा रोकडे आदि पदाधिकारी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे