आपल खान्देश

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची धरणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर.संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री. अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री. ईश्वरभाऊ चोरडिया यांनी जिल्हा उपाध्यक्ष श्री. योगेशभाऊ पाटील आणि जिल्हा सचिव श्री.जितेंद्रभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील वेब मीडिया असोसिएशन कार्यकारिणी केली जाहीर.

धरणगाव (प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनला व वेब पोर्टल पत्रकार संघटने’ला जोरदार प्रतिसाद मिळत असुन* प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल चे पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत सामील होताना दिसुन येत आहे.

आज धरणगाव येथे वेब मिडिया असोसिएशन च्या तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. *संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया अध्यक्षतेखालील जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील जिल्हा सचिव जितेंद्र महाजन यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

धरणगाव येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते धरणगाव तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

तत्पुर्वी जिल्हा संघटक’पदी – आबा वाघ यांची निवड करण्यात आली.तर

धरणगाव तालुका अध्यक्ष पदी -*विजय पाटील ( संपादक लाइव्ह महाराष्ट्र न्युज ) ,तालुका उपाध्यक्ष- योगेश नवनीत पाटील,तालुका सचिव- निलेश पवार,तालुका समन्वयक-सतिष शिंदे,तालुका सरचिटणीस-धनराज पाटील,तालुका खजिनदार- राजेंद्र बाविस्कर यांची निवड करण्यात आली आहे.

वेब मीडिया असोसिएशन धरणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे