ग्रामपंचायत कर सरासकट माफ करावा असे निवेदन ग्रामविकास मंत्र्यांना देण्यात आले
2020 ते 2021 या काळातील ग्रामपंचायत कर माफ करण्यात यावा असे निवेदन ग्रामविकास मंत्री हनीफ मुश्रीफ यांना योगेश परदेशी यांनी दिले जेणे करून करोना या भीषण महामारी च्या काळातील गरीब जनते वरील आर्थिक ताण कमी होईल योगेश परदेशी यांनी असे आमच्या माध्यमाना जवळ मत व्यक्त केले.
मुंबई – दिनांक २६ मार्च २०२१ भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण चे सह संघटक श्री. योगेश भाऊ परदेशी यांनी लोकांची मागणी वरुन मुंबई येथे मा.ना. हसम मुश्रीफ साहेब ( ग्रामविकासमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या कडे संपुर्ण महाराष्ट्रात १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ च्या काळातील “ग्रामपंचायत कर” माफ करण्यात यावे असे पत्र देण्यात आले.
मागील वर्षे हे कोविड-१९ कोरोना महामारीच्या काळोख्यातुन गेला, आजुन त्याचे गडद सावट आहेत. यातुन ग्रामीण भागातील लोकांचे रोजगार गेले, हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातुन जेमतेम बाहेर येण्याचा प्रयत्न होत होते त्यात अवकाळी पावसाने झोडपले यात शेतकरी, शेतमजुर , हातमजुर, कष्टकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
आपण सर्व बाबींचा विचार करुन एका वर्षाचे “ग्रामपंचायत कर” माफ करावे,
हि नम्र विनंती केली

ठाणे जिल्ह्यातील ओबीसी समाजाला उभारी देणारे मा. श्री.कपिलजी पाटील साहेब (खासदार भिवंडी लोकसभा)व मा.आमदार श्री.किसनजी कथोरे साहेब (भाजपा जिल्हा अध्यक्ष ठाणे ग्रामीण)तसेच भारतीय जनता पार्टी ओ बी सी मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मा. दादासाो रविंद्र चंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निवेदन दिले.


