Ajit Pawar : ढाण्या…थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, रोहित पवारांचा दादांना वाकून नमस्कार..
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणे देशाचे उपपंतप्रधान राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन आहे. राज्यभरातून राजकीय नेतेमंडळी कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर मानवंदना देण्यासाठी पोहोचले आहेत. अजित पवारही आपल्या नेत्यांसह प्रीतीसंगमावर पोहोचले होते. त्यावेळी शरद गटाचे आमदार रोहित पवार समोरासमोर आले. आपल्या स्टाईलमध्ये रोहित पवारांना थोडक्यात वाचलास म्हणत दर्शन घे दर्शन काकाचं असं दादा म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. रोहित पवारांनीही अजित पवारांना वाकून नमस्कार केला.
नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेऊन अजित पवार निघाले होते. त्यावेळी रोहित पवारही आले होते, तेव्हा दादांनी त्यांना दर्शन घे म्हणत पाया पडायला लावले. रोहित पवारांनीही आपल्या काकांना वाकून नमस्कार केला. ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असं म्हणत दादा निघून गेले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.



