बदलापूरच्या खान्देश महोत्सव पंडित परदेशी, रमेश आबा परदेशी यांचा सन्मान आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते…
- बदलापूर | दिलीप जय परदेशी
बदलापूर शहरात शनिवारी वामन म्हात्रे फॉउंडेशन व खान्देश प्रतिष्ठान बदलापूर यांच्या वतीने शनिवार, दि.२९ मार्च दिवशी मोठया थाटात खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात होते, खान्देश महोत्सव शानदार, बहारदार खान्देशी संस्कृतीचा सांस्कृतिक महोत्सव संपूर्ण बदलापूरकरांसाठी खानदेश वासियांसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणीच ठरला.
खान्देशचे पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, वामन म्हात्रे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वामन शेठ म्हात्रे यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थितीत थाटा माठात खान्देश महोत्सव घेण्यात आला. आमदार किशोर आप्पा पाटील, शुभांगीताई पाटील यांच्या हस्ते खान्देश महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर प्रसंगी आप्पांनी जोरदार मनोगत व्यक्त केले आमच्या खान्देशी बांधवांना महानगरपालिकेत नगरसेवकाच्या किमान ४/५ राखीव जागा ठेवणे इतर महामंडळा वर नियुक्ती करून, खान्देश भवन बांधण्यात यावे अशी मागणी केली, वामन म्हात्रे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वामन शेठ म्हात्रे यांनी सांगितले की आगरी समाजाचा भवन होत असून त्या भावना शेजारीच खान्देश भवन थाटामाटात उभे राहिल,
खान्देशी बांधव मोठया प्रमाणात या उत्सवात सभागी झाले आणि त्यांनी मन मुराद आनंद लुटला वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून बदलापूर शहरात खान्देश महोत्सव आता दरवर्षी घेण्यात येईल असे सांगितले वामन शेठ म्हात्रे यांनी बोलतांना सांगितले.
उपस्थित समाज बांधवांनी त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केले, घरोघर संदेश सोनाना खान्देश अशा घोषणांनी मैदान दणाणून सोडले, सदर प्रसंगी स्टार गौतमी पाटील, महेश कुमावत, रिल्स स्टार अशोक भाऊ पाटील, रिल्स स्टार ललिता पाटील तोंडाय आक्का यांच्यासह, खान्देशी संस्कृती, खान्देशचा इतिहास, कानबाईच्या गाण्यासह खान्देशी कलाकारांच्या गाण्याची धूम उडाली.
18 आलुतेदार 12 बलुतेदार यांचे सत्कार करून समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आले. याप्रसंगी खान्देश महोत्सवात प्रथमच धनगर समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे सल्लागार पंडित पितांबर परदेशी, संस्थापक रमेश आबा परदेशी यांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
- खान्देशी धनगर बांधव मोठया संख्येने उपस्थिती दाखवली
धनगर समाज बांधव यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. खानदेश महोत्सव आयोजन करणारे वामन शेठ म्हात्रे व खानदेश प्रतिष्ठान यांचे ऋण व्यक्त केले, संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबई, ठाण्यात धनगर समाजाची दखल घेत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो असे मत धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी यांनी सांगितले. धनगर समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे यांच्यासह ज्येष्ठ इतिहासकार व धनगर समाजाचे सल्लागार बापूसाहेब हटकर यांनी अमेरिकेतून दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले समाजातील विविध मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. यावेळी धनगर समाज बांधव पिवळे कुर्ते,उपरणे धारण करून उपस्थित होते.



