ब्रेकिंगमहाराष्ट्र

धारावीत सिलिंडर स्फोट, 5 जणांची प्रकृती गंभीर, तर 14 जण होरपळले!

शरण खन्ना

मुंबई। धारावीत गॅस सिलिंडर स्फोटात 15 जण होरपळले आहेत. त्यापैकी 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत तीन जणांचे चेहरे भाजले असून त्यात एका 8 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. धारावी-माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी 12.28च्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिन आइणइ एका जेटीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली

धारावी-माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी 12.28च्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिन आइणइ एका जेटीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दुर्घटनेत दोन जण 50-60 टक्के होरपळले

एकूण 15 जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 10 जण किरकोळ भाजले आहेत. तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे दोघे 50-60 टक्के भाजल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डॉ. सायली यांनी सांगितलं.या दुर्घटनेत दोन जण 50-60 टक्के होरपळले आहेत. तसेच तीन जणांचे चेहरे भाजले आहेत. यात एका आठ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. गंभीर भाजलेल्या या पाचही जणांमध्ये 8 ते 58 वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे