आपल खान्देशराजकीय

20 वर्षानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच एकनाथ खडसेंच्या घरी!

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे.

जळगाव। एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील संवादाला सुरुवात झाली आहे. 20 वर्षात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील हे खडसेंच्या मुंबईतील घरी गेले. यावेळी दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या भेटीनंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवादही साधला. खडसेंना शह देण्याची या मागची कोणतीही खेळी नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. याशिवाय सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. स्वतः गुलाबराव पाटील हे सुध्दा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जळगाव जिल्हा बँकेवर सध्या एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. पाटील यांनी नुकतीच खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 20 वर्षात प्रथमच आपण खडसेंच्या मुंबईच्या घरी गेलो, असं पाटील यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलं.

जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी तयार

निवडणुका 31 ऑगस्टनंतर तातडीने घेण्यात याव्या यासाठी प्रारुप मतदार याद्या तयार करण्याचे आदेश 9 ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहेत. जिल्हा बँकेची प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सहकार विभागाने आताच आदेश काढले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे