गुन्हेगारीदेश-विदेश

Video: आदिवासी तरुणाला ट्रकला बांधून बेदम मारहाण, मारहाणीत तरुणांचा मृत्यू

मध्य प्रदेश च्या नीमच जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरी च्या संशयावरून एका आदिवासी तरुणाला स्थानिकांनी मारलं आहे. पोलिसांनी या संदर्भात ४ जणांना अटक केली असून आणखी ४ जणांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली स्टेशनमध्ये घडली आहे. बाणदा गावातील स्थानिक कान्हा उर्फ कन्हैया भील याला चोरीच्या संशयातून पकडलं गेलं. आणि त्याला बेदम मारहाण केली. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कान्हा हात जोडून जीवाची भिक मागत होता.परंतु कुणालाही त्याची दया आली नाही. बेदम मारहाणीनंतर त्याचे हात-पाय बांधून त्याला एका लोडिंग ट्रकला बांधून फरफटत नेलं. या दरम्यान तो जखमी झाला. तसंच आरोपींनी या घटनाक्रमाचा व्हिडिओ बनून व्हायरल केला आहे. आदिवासी तरुण जखमी असल्याची माहिती १०० नंबरला दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले असता समजले की ज्यांनी फोन केला त्यांनीच कान्हाला बेदम मारहाण केली होती.

सिंगोली पोलिसांनी यासंदर्भात आठ जणांवर हत्या, एट्रोसिटी एक्ट सह अन्य कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी महेन्द्र गुर्जर सह चार जणांना अटक केली आहे. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानं माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी मध्यप्रदेश मधील शिवराज सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे