खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रत्यक्ष भेटून मानले आभार
जळगाव मतदारसंघातील प्रस्तावीत रस्ते विकासाला निधी कमी पडू देणार नाही केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे आश्वासन!¡
धुळे बोढरे रस्त्यास मंजुरी दिल्याबद्दल खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रत्यक्ष भेटून मानले आभार
—————————————-
जळगाव —-जिल्ह्याच्या दळणवळणास चालना मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या धुळे ते बोढरे राष्ट्रीय महामार्ग 211 या मार्गासाठी गेल्या पंधरवड्यात 1007 कोटी रुपयाच्या कामांची निविदा प्रसिद्ध झाल्याने या परिसरातील सांस्कृतिक ,आध्यात्मिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून जळगाव मतदारसंघातील प्रस्तावीत रस्ते विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन धुळे बोढरे रस्त्यास मंजुरी दिल्याबद्दल प्रत्यक्ष भेटून आभार मानले आहेत. आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी रवी भवन येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि आभार व्यक्त केले आहे.
बोढरे ते धुळे (फोर लेन) चौपदरीकरण वैशिष्टे विकासाच्या सेतू कामास शुभारंभ
बोढरे ते धुळे (फोर लेन) चौपदरीकरण रस्त्यांचेवै शिष्टे
- 67.231 KM
- धुळे चौफुली ते कन्नड घाट पायथा बोढरे पर्यंत चौपदरीकरण
- 27-10-2020 निविदा निघाली
- 1007 कोटी रुपये..
(एक हजार सात कोटी रूपयांची निविदा रस्त्याचे चौपदरीकरण)
- चार मोठे ब्रीज :- गिरणा नदी, विंचूर बोरी नदी,
चाळीसगाव बायपास खडकी,
चाळीसगाव बायपास मालेगाव रोड,
- तीन VUP अंडरपास :- मालेगाव रोड चाळीसगाव येथे बायपास,
मेहुणबारे बायपास,
शिरूड चौफुली.
- लहान तीन LVUP (लहान अंडरपास)
पाटणादेवी वालझीरी चौफुली बायपास,
जूनोने गावाजवळ,
गरताड बायपास
- कामाची मुदत अडीच वर्ष (30 महिने)
आदेश दिनांक 13 मार्च (काम घेतलेल्या कंपनीचे नाव- कलथीया इंजीनियरिंग कंट्रक्शन अहमदाबाद)
विविध विषयांवर चर्चा
आज दिल्ली येथे माननीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीजी यांची परिवहन भवन येथील कार्यालयात भेट घेतली यावेळी जळगाव लोकसभा मतदार संघातील चाळीसगाव तालुक्यातील बोढरे-धुळे महामार्गाला मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले, तसेच ऑट्रम घाट बोगद्याच्या प्रकल्पासाठी पत्रव्यवहार केला आणि प्रवाशी जनतेच्या अपेक्षा पोहचविल्यात. तसेच एन.एच. तरसोद – फागणे ह्या रस्त्याची भीतीदायक परिस्थिती लक्षात आणून दिली व जळगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावा.जेणेकरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जावे लागणार नाही . या विषयी चर्चा केली असुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदार संघातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे. अशी माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे.


