अकोल्यातील कुंटणखान्यावर मोठी कारवाई…३ महिलांसह २ ग्राहक ताब्यात
अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर खदान पोलिसांनी छापा टाकून तीन महिलेसह दोन पुरुषांना अटक केली आहे. अकोल्यातील गौरक्षण रोडवरील आदर्श कॉलनीतील एका घरात हा कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावर आज पोलिसांना छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी देह व्यापार चालतो येथे ग्राहकांना आवश्यकते नुसार पैशाचे मोबदल्यात महीला व तरुणींचा पुरवठा केल्या जात असल्याचेही समोर आले. चांगल्या घरातील महिलांना पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलीस तपासांत समोर आलेय.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खदान पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस आणि त्यांच्या टीमने सापळा रचून लगेच कारवाई करून दोन ग्राहकांसह तिन महिलांना ताब्यात घेतलेय. या प्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करीत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा