महाराष्ट्र

मुंबई पोलीस दलातील आणखी तीन जणांवर वसुलीचा आरोप

मुंबई : परमबीर सिंग, सचिन वाझे अशा अधिकाऱ्यांमुळे आधीच पोलीस दलाची बदनामी झालेली असतानाच आता आणखी तीन पोलिस अधिकाऱ्यांवर वसुलीचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून १७ लाख रुपये पोलीस अधिकाऱ्यांनी उकळल्याचा आरोप एका प्रॉपर्टी डिलरने केला आहे.

२०१९-२० मधील ही घटना असल्याचा दावा तक्रारदार प्राॅपर्टी डिलरने केला आहे. यासाठी त्यांनी अंधेरी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास करुन योग्य कारवाई करण्याचे आदेश अंधेरी कोर्टाकडून देण्यात आले होते. या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर आंबोली पोलिसांनी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार, पैसे देऊनही आरोपी पोलिस अधिकारी सातत्याने पैशांची मागणी करत होते. आणखी पैसे न दिल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याला अडकवण्यासाठी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. हा गुन्हा पुढे तपासासाठी गुन्हे शाखा 10 कडे वर्ग केला होता. इतक्यावरच न थांबता पोलिसांनी तक्रारदाराला मारहाण करत कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यामध्ये एक पोलिस उपायुक्त व दोन पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

ZOOM Advertising

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे