महाराष्ट्र

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभधारकास रहिवाशी दाखला मिळावा :- आनंद बनसोडे

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभधारकास रहिवाशी दाखला मिळावा :- आनंद बनसोडे

पिंपरी :- संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अर्जदारास रहिवाशी दाखला मिळावा यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना पिंपरी विधानसभा अध्यक्ष श्री आनंद बनसोडे यांनी अप्पर तहसीलदार पिंपरी चिंचवड व पिंपरी विधानसभा आमदार आण्णासाहेब बनसोडे यांना निवेदन दिले त्यात त्यांनी म्हटले की संजय गांधी निराधार अनुदान योजनेत अंपग, अंध, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना मिळतो पिंपरी विधानसभेतील ज्यास्तीत ज्यास्त लाभधारक हे झोपडपट्टीत या भागातील आहे लाभधारक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती ही अशिक्षित आहेत अर्जदारास त्यांचा वडिलांचा जन्म नोद दाखला किंवा शाळेचा दाखला मागितला जातो ते त्यांना मिळणे शक्य होत नाही या अडचणीमुळे सदर योजनेतील लाभधारक वंचित राहतात व त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही ज्यास्तीत ज्यास्त लाभार्थीना याचा फायदा होईल व त्यांना रहिवाशी दाखला मिळेल यासाठी अप्पर तहसीलदार व पिंपरी विधानसभा आमदार निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे इतर सदस्य सुध्दा उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे